Home Cities अमळनेर गणेश कॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली

गणेश कॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील तांबेपूरा भागातील गणेश कॉलनीतून एका तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, प्रविण गंगाराम शिंदे वय ४२ रा.गणेश कॉलनी, तांबेपूरा अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएफ ९६१९) ही घरासमोर पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रविण शिंदे यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळाली नाही. अखेर शनिवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयंत सपकाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound