अंगावर गरम पाणी पडल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाच्या अंगावर गरम पाणी पडल्याने चटणी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली. वैभव अनिल पाटील (वय २२, रा. आव्हाने, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात वैभव पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १९ नोव्हेंबर रोजी वैभव पाटील हा घरी एकटाच असताना त्याच्या अंगावर गरम पाणी पडले होते. त्यानंतर तो घराबाहेर ओरडत आला होता. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content