भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बसस्थानकाबाहेर उभा असलेल्या तरूणाला सोबत येण्यास नकार दिल्याने पोटावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे रामकरण महेश कुशवाह हा तरूण आपल्या आईवडी व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. तो भुसावळ बसस्थानक आवारात भूईमुंगाच्या शेंगा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे रामकरण हा बसस्थानकाच्या बाहेर परिवारासह उभा असतांना त्याच्या ओळखीचा जय राजू शिंदे हा तरूण तिथे आला. त्यावेळी त्याने रामकरण यांच्याकडे ७० रूपये मागत माझ्यासोबत चल असे सांगितले. त्यावर रामकरण याने नकार दिला. या रागा आल्याने जय शिंदे याने खिश्यातून लोखंडी सारख्या धारदार शस्त्राने पोटावर वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर त्यांच्या आईसह परिवाराने जखमी अवस्थेत त्याला भुसावळातील ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांची आई सुनिता महेश कुशवाह यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जय राजू शिंदे रा. लालबाग बऱ्हाणपूर मध्यप्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.