किरकोळ कारणावरून तरूणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील आझाद नगरात बांधकामाचे मटेरीयल टाकल्याच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करत मारहाण केली. व धारदार शस्त्राने वार करून दुखापत केल्याची घटना १ जून रोजी सकाळी १० वाजता समोर आली. याप्रकरणी मंगळवारी ४ जून रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख तौफीक शेख रफिक वय २३ रा. आझाद नगर, पिंप्राळा हुडको हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या समोर बांधकामाचे मटेरीयल टाकले होते. यावरून शेजारी राहणारे तौसीफ खान याला बांधकामचे मेटरीयल का टाकले असे जाबा विचारला. याचा रागातून १ जून रोजी सकाळी १० वाजता शेख तौफिक याला तौसीफ खान, आसीफ खान, मशेफखान, आणि शफिखान या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तर एकाने धारदार शस्त्राने वार करून तौफिकला जखमी केले. याप्रकरणी रामांनद नगर पोलीसा फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मंगळवार ४ जून रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ भूषण जैतकर हे करीत आहे.

Protected Content