अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निमझरी गावाजवळ पैसे मागण्याच्या कारणावरून तरूणाच्या मानेवर व कानाच्या खाली ब्लेडने वार करून जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे. याप्रकरणी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, रावसाहेब चिंधू पाटील वय ३९ हा तरूण अमळनेर तालुक्यातील निमझरी येथे वास्तव्याला आहे. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पैसे मागण्याच्या कारणावरून देविदास दगा कोळी रा. निमझरी ता.अमळनेर याने रावसाहेब पाटील यांच्या कानाच्या खाली आणि मानेवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. तसेच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी देविदास दगा कोळी रा. निमझरी ता.अमळने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव हे करीत आहे.