जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील एलआयसी कार्यालयासमोर उभे असलेल्या तरूणाला दुचाकी धडक दिल्याने जखमी झाल्याची घटनन १ जून रोजी रात्री ८.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ३ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नयन सुरेश ठाकूर वय ३१ रा. गिरणा पंपींग रोड, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १ जून रोजी रात्री ८.३० वाजता ते स्वातंत्र्य चौकातील एलआयसी कार्यालयासमोर नयन ठाकूर हा आलेल होता. त्यावेळी दुचाकी (एमएच १९ सीबी ३०९२) वरील अज्ञात चालकाने तरूणाला जोरदार धडक दिली. या तरूण गंभीर जखमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचार घेतला. त्यानंतर तरूणाने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ३ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख ह्या करीत आहे.