अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण ठार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील चोरवड गावाजवळील हॉटेल मातोश्री समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत ३४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी १४ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन श्रीराम सपकाळे वय ३४ रा. कुऱ्हा ता. भुसावळ असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा येथे सचिन सपकाळे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार १४ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजता सचिन सपकाळे हा चोरवड गावाजवळील हॉटेल मातोश्री जवळून पायी जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने सचिनला जोरदार धडक दिली. या धडकेत सचिनचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनावरील चालक वाहन घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी महेंद्र शिवदास सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुरूवार १४ मार्च रोजी दुपारी ५ वाजता अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा अंधारे हे करीत आहे.

Protected Content