जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात वाहनाला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला धर्म व जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर रामसिंग दहीयेकर (वय २५, रा. जाखणी नगर जळगाव) हे १३ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल दर्गा जवळून जात होते. यावेळी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून अरबाज, नाजीम नाना आणि सोहेल खान (पूर्ण नाव माहीत नाही) रा. गेंदालाल मील, जळगाव यांनी मयूरला अडविले. काही कळण्याच्या आतच तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे करीत आहे.




