अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरापासून जवळ असलेल्या बोरी नदीत्रात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात चार जणांनी तरूणाला बॅट, स्टम्प आणि रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २ जून रोजी सायंकाळी ५ वाजात घडली. याप्रकरणी मंगळवारी ४ जून रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील बोरी नदीत रविवारी २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता काही तरूण क्रिकेट खेळत होते. त्यावेळी काही तरूणांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद निर्माण झाला. या ठिकाणी पंकजकुमार मन्ना वय २२ रा. अमळनेर या तरूणाला अरविंद दर्यासिंग मोरे, निलेश रमेश ठाकूर, रविंद्र किसन काठोडी आणि आकाश काठोडी सर्व रा., अमळनेर यांनी बॅट, स्टम्प आणि रॉडने मारहाण केली. या मारहाणीत पंकजकुमार मन्ना हा गंभीर जखमी झाला. त्याला गावातील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी ४ जून रोजी अमळनेर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे अरविंद दर्यासिंग मोरे, निलेश रमेश ठाकूर, रविंद्र किसन काठोडी आणि आकाश काठोडी सर्व रा., अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.