मुलीची बदनामी केल्यावरून तरुणाला बेदम मारहाण: तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गावात मुलीची बदनामी करीत असल्याच्या कारणावरुन तिघांनी मयूर नामदेव पाटील (वय २७, रा. जामोद, ता. जळगाव) याच्यासह त्याचा भाऊ आणि आईला शिवीगाळ करीत काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले. ही घटना जामोद गावातील बस स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जामोद गावात मयूर नामदेव पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. ४ मार्च रोजी सायंकाळी तो गावातील बसस्थानक परिसरामध्ये त्यांचा लहान भाऊ शुभम हा गावातील तरुणीची बदनामी करतो, असा संशय आल्याने कैलास गुलाब पाटील, भूपेंद्र कैलास पाटील व छायाबाई कैलास पाटील या तिघांनी शुभमला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी व लाकडी काठीने त्याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. यावेळी त्याची आई ललिताबाई पाटील व मयूर हे त्यांना समजविण्यासाठी गेले असता, त्यांना देखील मारहाण करुन दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी मयूर पाटील यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहकॉ बापू पाटल करीत आहे.

Protected Content