जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जून्या भांडणाच्या कारणावरुन तीन जणांनी तरुणांच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केले. ही घटना २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजी नगर उड्डाणपुखाली असलेल्या चहाच्या टपरीसमोर घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरात दीपक माने हा तरुण वास्तव्यास असून त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या खाली जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील भांडणाच्या कारणावरुन अयान शरिफ पटेल, अनिस रेहमान पटेल याच्यासह एक जणासोबत वाद झाला. या वादातून तिघांनी दिनेश माने याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून गंभीर जखमी केले. माने याचा मित्र अमोल मोरे हा त्याला वाचविण्यासाठी आला असता, त्याच्या डोक्यात सिमेंटचे ब्लॉक टाकून गंभीर जखमी केले. दोघ जखमींनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार घेतल्यानंतर दिनेश माने यांनी शहर पेालीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित अयान शरिफ पटेल, अनिल रहेमान पटेल व अन्य एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रकाश वाघ हे करीत आहे.




