Home क्राईम भाड्याचे पैसे देण्यावरून तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण !

भाड्याचे पैसे देण्यावरून तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर फाटा येथे भाड्याचे पैसे देण्याच्या कारणावरून एका तरुणाला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून त्याच्या कपाळावर लोखंडी कडे मारून दुखापत केल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राने दिलेले माहिती अशी की वैभव कॅन्सिंग पाटील (वय २५ रा. कुसुंबा ता. जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे दरम्यान गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रायपुर फाटा येथे असताना विक्की आजाबसिंग पाटील याने दुचाकीवर जळू येथे सोडून दे, नाहीतर मला भाड्याचे पैसे दे असे सांगितले. त्यावर वैभव पाटील यांनी नकार दिल्याने या रागातून विक्की अजबसिंग पाटील, पवन राजपूत, निखिल पाटील, सागर तीरसिंग पाटील, सर्व (रा. कुसुंबा ता. जळगाव) या चौघांनी शिवीगाळ करत लाथा बोक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एकाने लोखंडी कडे कपाळावर मारून जबर दुखापत केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली.


Protected Content

Play sound