दारूच्या नशेतील तिघांकडून तरूणाला बेदम मारहाण करून दुखापत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिव कॉलनीतील हॉटेल स्वाद येथे जेवणासाठी गेलेल्या तरूणाला तीन जणांनी दारूच्या नशेत येवून शिवीगाळ व मारहाण करत जवळील खूर्ची मारून डोळ्याला दुखापत केल्याची घटना मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी ७ ऑगसट रोजी पहाटे ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, नितेश जयराम बच्छाव वय ३३ रा वाघ नगर, जळगाव तरूण मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास त्याचे मित्र शरद साळवे व दिपक असे तिघेजण शिवकॉलनीतील हॉटेल स्वाद येथे जेवणासाठी बसलेले होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला नितीन गंगाधरराव देशमुख वय ५० रा. जिल्हापेठे, लिलाधर सदाशिव तायडे वय ७१ रा. शिवकॉलनी आणि विनोद राजू चव्हाण वय ३५ रा. धरणगाव हे तिघेजन दारू पिण्यासाठी असलेले असतांना मोठमोठ्याने आरडाओरड करत होते. त्यावेळी नितेश बच्छाव या तरूणाने तिघांना हळू अवाजात बोलण्याचे सांगितले. या रागातून तिघांनी नितेश याला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जवळील खुर्ची मारून डोळ्याला दुखापत केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार बुधवारी ७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता मारहाण करणारे नितीन गंगाधरराव देशमुख, लिलाधर सदाशिव तायडे आणि विनोद राजू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.

Protected Content