कारण नसतांना तरूणाला फायटरने मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावात काहीही कारण नसतांना तरूणाला फायटरने नाकावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवार १९ जून रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावात दुर्गेश रामदास कोलते वय ३६ हे वास्तव्याला आहे. ठेकेदारीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता काहीही कारण नसतांना विशाल सतीश महाजन आणि गोकुळ काशीनाथ लोहार दोन्ही रा. फेकरी ता. भुसावळ यांनी निंभोरा गावात येवून दुर्गेश कोलते याला शिवीगाळ करून फायटरने नाकावर बेदम मारहाण करत दुखापत केली. याबाबत दुर्गेश कोलते याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार विशाल सतीश महाजन आणि गोकुळ काशीनाथ लोहार दोन्ही रा. फेकरी ता. भुसावळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे हे करीत आहे.

Protected Content