जुन्या वादातून दारूच्या नशेत तरूणाला शिवीगाळ करत मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील मराठे मंगल कार्यालयाजवळ जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला दारूच्या नशेत येऊन शिवीगाळ करून वीट डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची घटना १ आक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी २ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल दगडू लोहार वय-४०, रा. छत्रपती शिवाजीनगर जळगाव हा तरुण कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून याच परिसरात राहणारा किरण पवार (पूर्ण नाव माहित नाही) याने दारूच्या नशेत येऊन अनिल लोहार याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेल्या विटेचा तुकडा उचलून अनिलच्या डोक्यात टाकला. त्यामुळे डोक्याला जखम झाली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी अनिल लोहार याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी २ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजता संशयित आरोपी किरण पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अश्विनी इंगळे करीत आहे.

Protected Content