Home क्राईम भीषण अपघातात दुचाकीस्वार तरूणाचा दुदैवी मृत्यू; गुन्हा दाखल

भीषण अपघातात दुचाकीस्वार तरूणाचा दुदैवी मृत्यू; गुन्हा दाखल

0
167

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्यावर उभ्या असलेल्या एका विनाक्रमांक ट्रॅक्टर ट्रॉलीने एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यात घडली आहे. जळगाव-अमोदा रस्त्यावरील हॉटेल जत्राजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये ज्ञानेश्वर रतन पाटील (वय ४०, रा. अमोदा खुर्द) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पाटील हे २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने (क्र. MH 19 CK 7571) जळगावहून गावी परतत होते. यावेळी अमोदा खुर्द गावाजवळील हॉटेल जत्रा परिसरात रस्त्याच्या मधोमध एक विनाक्रमांक ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभा होता. अंधार असल्याने आणि रस्त्यात अचानक आलेल्या या अडथळ्याचा अंदाज न आल्याने ज्ञानेश्वर यांची दुचाकी थेट ट्रॉलीवर जाऊन धडकली.

या भीषण धडकेत ज्ञानेश्वर पाटील यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर इजा झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मृत्यूशी झुंज देत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी मृत ज्ञानेश्वर यांचे वडील रतन रामदास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. रस्त्याच्या मधोमध धोकादायक पद्धतीने ट्रॅक्टर उभा करून अपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Protected Content

Play sound