जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील ३७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीने फाशी लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल परशूराम पाटील वय ३७ रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात विशाल पाटील हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. सोमवारी ७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचे नातेवाईक राहूल पाटील यांच्यासह शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी हे करीत आहे.




