चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा येथील २३ वर्षीय तरूण घरात कुणाला काहीही न सांगता गुरूवार ९ मे रोजी दुपारी १२.३० वाजेपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात शनिवारी ११ मे रोजी दुपारी २ वाजता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अमोल एकनाथ माळी वय २३ रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल माळी हा तरूण आपल्या कुटुंबासह चाळीसगव तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा येथे वास्तव्याला आहे. गुरूवारी ९ मे रोजी दुपारी १२.३० वाता घरात कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेला. त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्याच्या पालकांनी शनिवारी ११ मे रोजी दुपारी २ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंदा सोनवणे हे करीत आहे.