भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकरी शिवारातील शेतातील पाटचारीत पडल्याने ३५ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी १० जून रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता भुसावळ तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निवृत्ती वसंत खरात वय ३५ रा. साकरी ता. भुसावळ असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/06/advt-aaj.jpg)
याबाबत अधिक असे की, निवृत्ती खरात हा तरूण आपल्या परिवारासह भुसावळ तालुक्यातील साकरी गावात वास्तव्याला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याने गावातील प्रकाश दामू कोल्हे यांचे शेत कसायला घेतले होते. दरम्यान, सोमवारी १० जून रोजी सकाळी ८ वाजता शेताजवळ असलेल्या पाटचारीतील पाण्यात पडल्याने निवृत्ती खरात या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना समोर आल्याने शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेवून बाहेर काढले व भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा अंधारे हे करीत आहे.