Home Cities अमळनेर विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील आमळगाव येथील ३० वर्षीय तरूण विहीरीत पडल्याने बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पिळोदे शिवारातील शेतात समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सतिष युवराज कोळी वय ३० रा. आमळगाव ता.अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे सतिष कोळी हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. पिळोदे शिवारातील प्रेमराज वामन चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत सतिष कोळी या तरूणाचा तोल जावून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता समोर आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून काही तरूणांच्या मदतीने त्याला बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound