खदानीत पडल्याने पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरातील एका ३८ वर्षीय तरूणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीला आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल रतीलाल चौधरी वय ३८ रा. मुक्ताईनगर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर शहरातील जुने नाका जवळील खदानीत अनिल चौधरी याचा पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीआहे. खदानीच्या पाण्यात कसा पडला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुक्ताईनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content