जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकाजवळील लूप ब्रीजजवळ अंदाजे २५ वर्षीय अनोळखी तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना १ जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस चौकाती अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव रेल्वेस्थानकाजवळील अप रेल्वेलाईनच्या रेल्वे खंबा क्रमांक ४१९ लूप ब्रीजसमोर सोमवारी १ जुलै रोजी मध्यरात्री १२.३० वाजता गोरखपुर-पुणे या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अंदाजे २५ वर्षी अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन भावसार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी उप स्टेशन प्रबंधक श्रीवास्तव यांच्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटवावी असे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन भावसार हे करीत आहे.