रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर येथील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर गुरूवारी सायंकाळी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती.
रावेरकडून आटवडेकडे जाणारी एमएच २० बीटी १७०४ क्रमांकाची बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकी यांची जोरदार धडक झाली. या धडकेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.