Home राजकीय राहुल गांधींसारखा ‘नालायक’ माणूस संसदेत पोहोचू नये; उद्धव ठाकरेंचे वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधींसारखा ‘नालायक’ माणूस संसदेत पोहोचू नये; उद्धव ठाकरेंचे वादग्रस्त वक्तव्य


rahul uddhav
 

सांगली (वृत्तसंस्था) सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधीसारखा नालायक माणूस संसदेत पोचता कामा नये, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लामपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, वीर सावरकरांनी देशासाठी जे कष्ट भोगलेय तसे कष्ट जर नेहरूंनी भोगले असते तर मी त्यांनाही वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे. तसेच मराठी समजत नसेल तर इटलीच्या भाषेत लिहून घेऊन भाषण करण्याचा सल्ला देत ही इटली नाही भारत आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. मागील वेळी चुकीच्या माणसासाठी हातकणंगलेची जागा सोडली होती. पण ती माझी चूक आता तुम्ही जनतेने सुधारायची आहे. गेल्यावेळी नको त्या माणसाला जागा दिली, असे म्हणत ठाकरे यांनी शेट्टीं यांच्यावरही टीका केली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound