जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावातील एका भागात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेच्या घरात घसूल अतिप्रसंग करत मारहाण करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा गावातील एका भागात ३५ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास महिला ही घरात एकटी झोपलेली असतांना गावात राहणारा संशयित आरोपी मनोज ज्ञानेश्वर बिऱ्हाडे हा महिलेच्या घरात घसून तिच्यावर अतिप्रसंग करत तिला अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली आणि विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मनोज बिऱ्हाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुर्यकांत नाईक हे करीत आहे.