जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अशोक किराणा दुकानाजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ व मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याबाबत रात्री १० वाजता एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, माया वालचंद तांबे (वय -३०, रा. रामनगर जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान या परिसरातील अशोक किरणा जवळून दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या जुम्मा सलीम पिंजारी रा. तांबापुर याच्या दुचाकीचा कट लागला. त्या कारणावरून जुम्मा पिंजारी यांनी महिला शिवीगाळ करत मारहाण करून जीवेठार मानाची धमकी दिली. याबाबत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी जुम्मा सलीम पिंजारी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहे.