धरणगाव पोलीसात मृत्यूची नोंद
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील हिंगोणा खुर्द गावातील ५० वर्षीय महिलेने ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरात विषारी औषध घेतले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धरणगाव ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेखा संतोष गायकवाड (वय-५०) रा. हिंगोणा खुर्द ता. धरणगाव असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेखा गायकवाड या महिला धरणगाव तालुक्यातील हिंगोणा खुर्द गावात आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी असतांना त्यांनी विषारी औषध सेवने केले. त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर उपचार सुरू असतांना बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील करीत आहे.