अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । न्यायालयात दिलेली तक्रार मागे घेण्याची धमकी देत महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी १८ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता अमळनेर न्यायालयाच्या बाहेर घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील बहाळ गावात ५० वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. महिलेने चंदन नरेंद्र भोळे रा. क्रांती नगर, अमळनेर याच्या विरोधात अमळनेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अनुषंगाने मंगळवारी १८ जून रोजी अमळनेर न्यायालयात तक्रारीवर कामकाज झाले. या तारखेला महिला ही आपल्या मुलासोबत आलेली होती. त्यावेळी संशयित आरोपी चंदन भोळे याने महिलेला शिवीगाळ करत तिला व तिच्या मुलाला मारहाण केली. तसेच न्यायालयात दिलेली तक्रार मागे घे, नाहीतर तुला व तुझ्या परिवाराला मारून टाकेल अशी धमकी देवून महिलेचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी चंदन नरेंद्र भोळे रा. क्रांती नगर, अमळनेर याच्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.