अमळनेर तालुक्यातून दोन मुलांसह महिला झाली बेपत्ता

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील गंगापुरी गावात राहणाऱ्या 30 वर्षीय महिला घरात कुणाला काहीही न सांगता आपल्या दोन मुलांसह 7 जून रोजी दुपारी 2 वाजेपासून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी सोमवारी 17 जून रोजी दुपारी अडीच वाजता अमळनेर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

वंदना विनायक भील वय 20, मुलगी भाग्यश्री विनायक भील वय 9 आणि आणि मुलगा तेजस विनायक भील वय 7 तिघे राहणार गंगापुरी ता. अमळनेर असे बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, वंदना दिली ही महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान 7 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास महिलाही मुलगी भाग्यश्री आणि मुलगा तेजस यांना सोबत घेऊन घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. याची चिंता व्यक्त करत तिचा नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध केली परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर महिलेच्या नातेवाईकांनी सोमवारी 17 जून रोजी दुपारी अडीच वाजता अमळनेर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील करीत आहे.

Protected Content