Home क्राईम एका समाजावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर; एकावर गुन्हा

एका समाजावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर; एकावर गुन्हा

0
145

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियावर एका विशिष्ट समाज आणि समाजाचे नेते यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आरोपीवर आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील संशयित आरोपी दिपक हरी सुरवाडे याने एका चारचाकी वाहनात बसून हा व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये त्याने एका समाजाबद्दल आणि समाजाच्या नेत्याबद्दल अत्यंत वाईट आणि अपमानजनक टिपण्णी केली आहे. हा व्हिडीओ त्याने जाणीवपूर्वक आणि वाईट हेतूने तयार करून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सार्वजनिक केला. त्यामुळे त्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादी रविंद्र जगन्नाथ ढगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मनोज रमेश येऊलकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Protected Content

Play sound