अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या हॉटेल सिंधू गार्डन समोरील रस्त्यावरून अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे वाहनावर धरणगाव पोलीसांनी बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई केली आहे. पोलीसांनी वाहन जप्त केले असून तीन गायींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता तीन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या हॉटेल सिंधू गार्डन समोरील रस्त्यावरून अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता पोलीसांनी कारवाई करत वाहन क्रमांक (एमएच २८ बीबी ४७१३) वर कारवाई केली. कारवाई केल्यानंतर पोलीसांनी वाहन जप्त केले असून तीन गायींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नागराज साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादाराव बाबुराव अहिरे वय ३५, विजय राजू सुर्यवंशी वय २८ आणि नितीन पाटील तिन्ही रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.

Protected Content