अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले; दोन जणांवर कारवाई

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवारातील कुसुमाई पेट्रोलपंपाजवळून गुरांची वाहतूक करणारे वाहन अमळनेर पोलीसांनी कारवाई करत मंगळवारी २८ मे रोजी पहाटे ४ वाजता पकडले असून तीन गायींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी सकाळी ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सावखेडा शिवारातील कुसुमाई पेट्रोलपंपाजवळून गुरांची अवैधपणे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने मंगळवारी २८ मे रोजी पहाटे ४ वाजता कारवाई करत पिकअप वाहन क्रमांक (एमएच २० ईएल ४३२८) पकडले. वाहनाची तपासणी केली असता तीन गायींना निर्दयीपणे बांधल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीसांनी वाहन जप्त केले असून गायींची सुटका करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाल गोविंद मंडावत वय-३० आणि साईनाथ मगन कानडजे वय-३२ दोन्ही रा. छत्रपती संभाजी नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव हे करीत आहे.

Protected Content