अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील साळवा फाटाजवळून अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे पिकअप वाहन धरणगाव पोलीसांनी पकडले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धरणगाव पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील साळवा फाट्याजवळून महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एमएच २१ बीएच ४१६९ मधून विनापरवाना दोन गुरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी ३ जून रोजी पहाटे ३.३० वाजता कारवाई केली. यात वाहनातून गुरांची निर्दयपणे कोंबून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी गुरांची सुटका करत वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी सोमवारी ३ जून रोजी रात्री ११ वाजता पोलीस कॉन्स्टेबल सुनिल सुलतानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक विष्णू बबन चांदलकर वय-२३, प्रकाश सिद्धार्थ जोगदंड आणि गुरांचे मालक सोमनाथ साहेबराव पवार तिघे रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर या तिघांविरोधात धरणगाव पोलिसात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार करीत आहे.

Protected Content