सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी दि. 22 सप्टेंबर 2024, स्वच्छता अभियान राबविन्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ सतीश दत्तात्रय पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ हरीश नेमाडे, सहाय्यक अधिकारी प्रा. डॉ विकास वाघुळदे, महिला अधिकारी प्रा. डॉ पल्लवी रवींद्र भंगाळे, प्रा. ए के पाटील, तसेच महाविद्यालय चे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये परिसरात गावागावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने फैजपूर बसस्थानक, खुशाल भाऊ रोड, आठवडे बाजार या भागात स्वच्छता मोहीम राबवली. यासोबतच गावात जाऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांनी स्वतः स्वच्छता राखेल, अस्वच्छता करणार नाही व स्वच्छते संबंधित जनजागृती कमीत कमी दहा परिवारांपर्यंत पोहोचवीन अशी स्वच्छ्ता शपथ घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांकडून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले व स्वच्छतेचा वसा घराघरापर्यंत पोहोचविण्याचे खात्री देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे व्यवस्थापन व प्रशासन यांचे मार्गदर्शन लाभले तर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतलेत.