Home क्राईम गोलाणी मार्केटमधून एकाची दुचाकी लंपास

गोलाणी मार्केटमधून एकाची दुचाकी लंपास

0
34
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिवाजी नगर येथील एका सोनाराची दुचाकी गोलाणी मार्केटच्या पार्किंगमधून चोरून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजी नगर येथील सोने कारागिर मोहम्मद निजामोद्दीन अब्दुल वाहेद वय ४१ हे सोमवार, ९ मे रोजी त्यांच्या खाजगी कामासाठी गोलाणी मार्केट येथे आले होते. यादरम्यान सायंकाळी ६ वाजता त्यांनी त्यांची एम.एच.१८ ए.टी. ५४८८ या क्रमाकांची दुचाकी गोलाणीमार्केटच्या सी विंगमधील पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये उभी केली. तीन तासानंतर काम आटोपून परतल्यावर त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने मोहम्मद वाहेद यांनी मंगळवारी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound