Home क्राईम श्रध्दा कॉलनीतून एकाची दुचाकी लंपास

श्रध्दा कॉलनीतून एकाची दुचाकी लंपास


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रध्दा कॉलनीत घरासमोर पार्किंगला लावली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, विलास जन्नाथ होले (वय-५८) रा. श्रध्दा कॉलनी, ओंकार अपार्टमेंट जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांच्या घरासमोर (एमएच १९ सीसी ५८४०) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे शुक्रवारी ८ जुलै रोजी सकाळी उघडकीला आली. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर शनिवारी ९ जुलै रोजी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.


Protected Content

Play sound