भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोडवर भिरूड हॉस्पिटलसमोर काल (दि.१२) मध्यरात्री २.३० च्या सुमारास ट्रक रिकामा करण्यासाठी आलेल्या चालकाला लुटल्याची घटना घडली.
सविस्तर माहिती अशी की, मध्यरात्री ट्रक रिकामा करण्यासाठी आलेल्या इम्रान मोहम्मद याला चार अज्ञात लोकांनी लुटल्याचे त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध भा.द.वि. ३९४ नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पो.उ.नि. दत्तात्रय गुळींग व पो.कॉ. समाधान पाटील करीत आहेत.