अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोण फाट्याजवळ भरधाव कारने दिलेल्या दोन बहिणींना दिलेल्या धडकेत एका ११ वर्षीय चिमुकलीचा दुदैवी मृत्यू झाला तर दुसरी बहिण गंभीर जखमी झाल्याची रविवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ८.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमन्ना सिध्दार्थ भालेराव वय ११ रा.चावलखेडा ता.धरणगाव असे मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील रहिवाशी असलेल्या तमन्ना सिध्दार्थ भालेराव आणि अर्चना सिध्दार्थ भालेराव हे दोन्ही बहिणी अमळनेर तालुक्यातील लोण गावी मामा अनिल प्रकाश खैरनार यांच्याकडे सुट्टीत आलेल्या होत्या. रविवारी १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता लोण फाट्याजवळून पायी जात असतांना भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १९ बीयू ५३३५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तमन्ना भालेराव या चिमुकलीचा मृत्यू झाला तर तिची बहिणी अर्चना ही गंभीर जखमी झाली. ही घटना घडल्यानंतर कारचालक घटनास्थळाहून पसार झाला आहे. याप्रकरणी अनिल खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ भरत ईशी हे करीत आहे.