Home क्राईम पाचोर्‍यात तीन मजली इमारत कोसळली; जीवीत हानी नाही

पाचोर्‍यात तीन मजली इमारत कोसळली; जीवीत हानी नाही

0
38

पाचोरा, प्रतिनिधी | शहरातील बाहेरपुरा भागातील तीन मजली इमारत बांधकामातील तांत्रीक दोषांमुळे रात्री कोसळली असून यात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.

बांधकाम करतांना गेल्या पाच वर्षांपुर्वी काही तांत्रिक दोष राहील्याने शहरातील बाहेरपुरा भागात तीन मजली इमारत कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. शहरातील व्ही.पी. रोड वरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपुर्वी बांधकाम केली होती. मात्र या इमारतीला पावसाने तडा पडला म्हणून येथे असलेले भाडेकरू यांनी इमारत रिकामी केली होती.

दरम्यान,रिमझिम चालणार्‍या पावसाने दि. २० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. यापूर्वी नगरपरिषद ने हा रोड बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणार्‍या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.


Protected Content

Play sound