जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हुडको शिवाजीनगर एकाच्या घरातून दोन मोबाईल आणि १० हजार रुपये रोख चोरून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार तनवीर उर्फ तन्या शेख रहीम (वय-१९) रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तनवीरची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. मात्र, चोरीला गेलेली रोख रक्कम अजून सापडलेली नाही. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र मेढे, पोलीस हवालदार विजय पाटील, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, प्रदीप चवरे यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला. अटक केलेल्या संशयित आरोपीला शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई सहाय्यक फौजदार सुनील पाटील हे करीत आहे.