पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे एका शेतकऱ्याच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथील रहिवशी जितेंद्र ननसिंग पाटील (वय ५१) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. २२ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत, त्यांच्या राहत्या घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. चोरट्याने अतिशय लबाडीच्या इराद्याने घरात प्रवेश करून ही चोरी केली. असे फिर्यादीत म्हटले आहे, चोरट्यांनीघरातून सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असाएकुण ६२ हजार ६३५ रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जितेंद्र पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.




