जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील तरूणाच्या घरात समोर पार्कींगलाला लावलेली दुचाकीला भीषण आग लागल्याची घटना १० एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवार १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानदेव हिरामण नाथ वय ३३ रा. नशिराबाद ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता त्याने त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएल ९०६२) ही पार्कींगला लावलेली होती. १० एप्रिल रोजी मध्यरात्री १ अचानक त्यांच्या दुचाकीला आग लागली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. शेजारी राहणाऱ्या महिला संगिताबाई नाथ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ज्ञानेश्वर नाथ यांना उठविले. दरम्यान, घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाण्याने ही आग विझविण्यात आली. ही आग कशी लागली याची माहिती समोर आलेली नाही. याबाबत सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख हे करीत आहे.