यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाला स्मशानभूमीसाठी शासकीय जमीन मिळावी, तसेच धुळे पाडा आदिवासी वस्तीतील आदिवासींना शिधापत्रिका, मतदान कार्डसह मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. येथील तहसील कार्यालयात निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर, तालुकाध्यक्ष विलास भास्कर यांच्यासह सुमारे १०० आदिवासींनी नायब तहसीलदार आर. डी.पाटील यांना निवेदन दिले.
तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे भिल्ल समाजाचे सुमारे १०० घरे आहेत मात्र त्यांच्यासाठी दफनभूमी नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे अडचणीचे ठरत आहे. भिल्ल समाजासाठी स्वतंत्र दफनभूमीसाठी जागा मिळावी यासह सांगवी बुद्रुक येथून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळेपाडा आदिवासी पाड्यावरील आदिवासींना राशन कार्ड तसेच मतदान कार्ड मिळाले नसून मूलभूत सुविधांचा अभाव आहे प्रशासनाने ही समस्या तात्काळ सोडविण्याची निवेदन तहसीलदार यांना दिले आहे तहसीलदार महेश पवार यांनी लवकरच समस्याग्रस्त भागाचा सर्वे करून त्यांना मूलभूत सुविधा देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.
निवेदन देते प्रसंगी उपाध्यक्ष अशोक तायडे, नंदा बाविस्कर, अरुण गजरे, प्रमोद पारधे, लक्ष्मी मेढे, सय्यद सकावत, अजय छपरीबंद, राहुल तायडे, कालिदास वडर, पिंटू भिल, नाना बारेला, मांगीलाल भिलाला, पिंटू बारेला, अनुबाई भिलाला, कमलबाई भिलाला, आशाबाई वडर यांच्यासह अनेक आदिवासी तहसील कार्यालयात उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी सांगितले की समस्याग्रस्त भागातील समस्या तात्काळ सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.