किनगाव गावातील ग्रामस्थांचे बीडीओंना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव बु॥ येथील रामराव नगर या वसाहतीत पावसाळयात सर्वत्र घाणीच्या सांडपाण्याचे साम्राज्य पसरले आहे. या घाणी व दुर्गंधीच्या पाण्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  स्थानिक ग्रामपंचायत या समस्यांकडे वारंवार तक्रारी करून देखील लक्ष दिले जात नसल्याने आता ग्रामस्यांनीच्या वतीने पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली आहे.

 

किनगाव गावातील रामरामनगर या परिसरात घाणीच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गटारी (नाली) बांधकाम करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना प्रवीण वसंत वराडे आदीनी दिले आहे. या अर्जात नमूद करण्यात आलेले आहे की आम्ही ग्रामपंचाय कार्यालय किनगाव बुद्रूक यांना ३ जुन रोजी रामराव नगरमध्ये गटारी (नाली) बांधकाम करण्याबाबत  अर्ज दिलेला असून वारंवार तक्रार करून देखील अद्याप गटारींचे बांधकाम होत नसून येथे गटारी नसल्यामुळे तेथे असलेल्या नालीचे घाणपाणी वाहुन अंकलेश्वर ब-हाणपुर महामार्गावर येत आहे व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत.

 

घाणीचे पाणी व पावसाळ्यातील पाणी यामुळे रहीवाश्यांना रहदारीस त्रास सहन करावा लागत आहे. या वस्तीला लागुन असलेल्या महामार्गा लगतच चहा आणी फराळ व आदी व्यवसायींकाची दुकाने असुन हे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याचा शक्यता नाकारता येत नाही.म्हणून आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आपण याविषयी लक्ष देऊन कार्यवाही करावी असे या अर्जात नमुद करण्यात आले आहे.

 

या निवेदनावर प्रवीण वसंत वराडे,संभाजी लक्ष्मण पालवे, योगेश, किरण पाटील,हितेश मधुकर वराडे, रणधीर संजय लोहार,पवनकुमार ज्ञानदेव मोरे,योगेश ज्ञानेश्वर कोळी!योगेश सुभाष साठे, विशाल भास्कर भावार्थ,संजय लक्ष्मण पाटील, वसंत मुकुंदा वराडे,मुकेश भगवान भोई, हेमराज प्रजापत,चेतन पाटील, जयप्रकाश सूर्यवंशी, नितीन प्रमोद तायडे,मनिषा वसंत वराडे, मंगला पाटील,भागवत महाजन, सुशीला पाटील,पवन संजय महाजन व संभाजी पाटील इ.च्या सह्या आहेत.

Protected Content