छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ धरणगावात शिवप्रेमींचे निवेदन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मालवण येथील छत्रपती शिवरायांचे स्मारक कोसळल्याचा निषेध व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी करत धरणगाव शहरातील सर्व समाज बांधव व शिवप्रेमींच्या वतीने मंगळवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मालवण येथे झालेल्या घटनेमुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मालवणी येथील छत्रपती शिवरायांचे स्मारक अवघ्या आठ महिन्यात कोसळले. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून कठोर शासन करण्यात यावे, भविष्यात कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीत अशा स्वरूपाचा अनुचित प्रकार घडणार नाही .याची शासन प्रशासनाने खबरदारी घ्यावी. तसेच धरणगाव शहरात असलेले क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे स्मारकांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे.

धरणगाव शहरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पूर्ण कृती स्मारकाचे सध्या काम सुरू आहे. या स्मारकाच्या नियोजित जागेवर स्मारकाचा कालावधी, स्मारकाची उंची, स्मारकाची एकूण व्याप्ती यासह इतर सर्व बाबींचा तपशील दर्शकविणारा फलक लावण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन शिवप्रेमींच्या वतीने देण्यात आले आहे.

Protected Content