Home क्राईम धावत्या कारचे टायर फुटून ट्रेलरवर धडक, दोन जण गंभीर जखमी

धावत्या कारचे टायर फुटून ट्रेलरवर धडक, दोन जण गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव पाळधी बायपासवर रविवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. धावत्या चारचाकी वाहनाचे अचानक टायर फुटल्याने ते विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवर धडकून हा अपघात झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरसोद फाट्याकडून पाळधीकडे जाणारे चारचाकी वाहन (क्र. एमएच १९, ईजी १८७८) आव्हाणे शिवारात बायपासवर असताना अचानक त्याचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुसऱ्या बाजूने पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या एका ट्रेलरच्या (क्र. सीजे ०७, बीआर ३७१७) डिझेल टँकवर जाऊन आदळली.

ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात यश रमेश शिंपी (वय २३, रा. पाळधी) आणि पल्लवी छाडीकर (वय २०, रा. मेहरुण) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांच्याही हाताला गंभीर दुखापत झाली असून, यश शिंपीच्या पायालाही मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले आणि दोघांनाही तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound