भरधाव कारची झाडाला धडक; कारचालक जागीच ठार

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भरधाव कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी १५ मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जालना मार्गावर रामजी हॉटेलजवळ घडली. अभिजित मधुकर वाघमारे असे मृताचे नाव आहे.

 

१५ जुलै सोमवार रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अभिजित वाघमारे हे क्रेटा कारने जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे चालले होते. भरधाव कारचा ताबा सुटल्याने त्यांची कार करमाड शिवारातील रामजी हॉटेलच्या जवळच असलेल्या एका झाडावर जाऊन धडकली. या वेळी झालेल्या भीषण अपघातात वाघमारे जखमी झाले.

या वेळी या रस्त्याने मार्गस्थ असलेल्या लोकांनी अपघाताची माहिती करमाड पोलिसांना दिली. माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेचे चालक बाळू कातकडे यांनी जखमीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी जखमी वाघमारे यांना तपासून मृत घोषित केले. मृत वाघमारे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व भावजय असा परिवार आहे. मयत अभिजित

Protected Content