पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात मध्यरात्री मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी आहे. जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर हॅरिस पुलाच्या खाली रात्री पावणे दोन वाजता हा अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना समोरून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झालाय. या अपघातात समाधान कोळी या पोलीस कर्मचारीचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी दोन्ही बीट मार्शल गस्तीवर होते. हॅरिस पूल बोपोडीजवळ हा अपघात घडला. समाधान कोळी या कर्मचाऱ्याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर शिंदे नावाचे पोलीस कर्मचारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर चालक फरार झाला आहे.
भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने काल 7 जुलै रोजी मध्यरात्री बोपोडी परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले आहे, यात एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा कर्मचारी हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात पोलिस कर्मचारी समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झालाय, तर पी. सी. शिंदे असं या अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार चालक फरार झाला असून त्याच्या शोधासाठी आता पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहेत. या घटनांमुळे रात्रीच्या वेळी गाडी चालवणे अवघड झाले आहे. ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.