मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिरसाळा येथील मारुतीचे दर्शन घेऊन मित्रासोबत परतणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने दिलेला धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावर असलेल्या साई वाशिंग सेंटरजवळ घडली आहे. मयूर रवींद्र महाजन (वय-३३, रा. मुक्ताईनगर, जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की मयूर महाजन हा शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा मित्र अतुल वराडे यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (Mh 19 AL 5343) बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारुतीच्या दर्शन घेण्यासाठी गेला होता त्यावेळी मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील सेंटर समोर समोर येणाऱ्या भरधाव कार क्रमांक (एमएच 20 सीएच 546) या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे. दरम्यान या घटनेबाबत नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन एकच आक्रोश केल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कारवरील चालक राम मोहन हंबर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.