धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धुळे लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. या मतदारसंघातील वंचितचे उमेदवार माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद झाला आहे. धुळे मतदारसंघात महायूतीकडून भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचित बहूजन आघाडीने अब्दूल रहमान यांना उमेदवारी दिली होती. या धुळे मतदारसंघात नाशिक जिल्हयातील मुस्लीम बहूल मालेगाव असल्याने वंचित बहूजन आघाडीचे अब्दूल रहमान यांच्या मतांच्या विभाजनामुळे महाविकास आघाडीला नुकसान होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतू अब्दूल रहमान यांचा अर्ज बाद झाल्याने धुळयाची निवडणूकीत ही लढत तिरंगी न होता दोरंगीच होणार आहे हे स्पष्ट झाले आहे. परंतू निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाविरोधात अब्दूल रहमान हायकोर्टात जाणार आहे.